top of page

रामजी पांगेरा
शिवभारतात म्हटल्याप्रमाणे रामजी पांगेरा म्हणजे महाराजांच्या पंचानीतील एक! ते स्वराज्यातील सर्वात तरुण असे शिलेदार होते.
अफझलच्या वधानंतर, १५०० मातब्बर लढाऊ सैन्याशी लढायची जबाबदारी रामजी पांगेरा यांच्यावर होती आणि प्रचंड पराक्रम दाखवून त्यांनी ही जबाबदारी पार पडली.
पुढे जेव्हा कण्हेरगडाला दिलेरखानाचा वेढा पडला होता तेव्हा आपल्या सोबतच्या ७०० मावळ्यांना प्रेरित करून, स्वपराक्रमाने ते २० हजाराच्या मुघल सैन्यावर चालून गेले होते. कण्हेरगड रामजींच्या आसमानी पराक्रमाने राखला गेला होता, पण ते मात्र स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान देऊन धारातीर्थी पडले होते.
bottom of page
